व्यक्तिमत्वे

वैशिष्ठ्यपूर्ण व्यक्तिमत्वे

 • मा. सरपंच श्री. धनंजयराव विधाटे
  1. जि.प. पुणे द्वारे उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श सरपंच पुरस्कार मा. विजयसिंह मोहिते पा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते.
  2. तळेगाव शहर पत्रकार संघाद्वारे आदर्श सरपंच पुरस्कार.

 


मा. श्री. व्यंकटराव भताने. प्राचार्य/ कार्यवाह, ग्राम प्रबोधिनी विद्यालय, साळुंब्रे ता मावळ

  1. अखिल महाराष्ट्र पत्रकार पत्रलेखक संघाद्वारे स्वातंय, समता, बंधुता ही भारतीय राज्यघटनेची तत्वे प्रमाणभूत मानून स्थानिक पातळीवरील सामाजिक ऐक्य राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याच्या महनीय कार्याबद्दल राष्ट्रीय एकात्मीका फेलोशिप – 2007 हा पुरस्कार.
  2. जि.प. पुणे व पुणे जिल्हा माध्य व उच्च माध्य ााहा मुख्याध्यापक संघाच्या वतीने उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल मा.ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कार.
  3. महाराष्ट्र राज्य औद्योगीक विकास परिषदेतफर्े पि​िंपरी चिंचवड परिसरात विशेष कार्य केल्याबद्दल स्मृतिचिन्ह व सन्मानपत्राने गौरव.
  4. महात्मा फुले शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास योजनेअंतर्गत ग्राम प्रबोधिनीचा पुणे जिल्हयात दुसरा क्रमांक आल्याबद्दल मा ना वसंतराव पुरके यांच हस्ते विशेष पुरस्कार.
  5. गुरवर्य गौरव पुरस्कार समिती अंबाजोगाई जि बीड यांच्याद्वारे कै नंदकुमार सेलूकर गुरुवर्य गौरव पुरस्कार.

विशेष पुरस्काराने सन्मानित

 • तळेगाव दाभाडे निगडी प्राधिकरण येथील महाराष्ट्रराज्य औद्यागिक विकास परिषदेच्या वतीने शैक्षणिक कार्यातील योगदानाबाबत साळुंब्रे येथील ग्रामप्रबोधिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्यंकटराव भताने यांना विशेष पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
 • औद्योगिक सांस्कृतिक तसेच शैक्षणिक विकासातील योगदान आणि एकविसाव्या शतकातील कर्तव्यदक्ष माणूस………
 • हा गुणगौरव समांरभ चिंचवड येथील एस के एफ युनियन सभागृहात पार पडला. टाटा मोटर्सचे महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली, सहायक कामगार आयुक्त टी जी चोळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
 • या पुरस्काराबद्दल व्यंकटराव भताने याचं मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब उभे उपाध्यक्ष एस टी भंगाळे ज्योती चोळकर सचिन देशमुख व सहसचिव राजू गायकवाड यांनतर अभिनंदन केले.