आरोग्य सुविधा

  1. साळुंब्रे अंगणवाडी, पुणे विभागात प्रथम, पवनानगर, साळुंब्रे अंगणवाडीस संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छ सुंदर अंगणवाडीचे विभागीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले पारितोषिक मिळविणारी ही जिल्हयातील एकमेव अंगणवाडी आहे.
  • साळुंब्रे येथील अंगणवाडीने राबविलेल्या गांडुळ खत, गप्पी मासे, मासे पाीन फळबाग, वृक्षारोपन परसबाग, सांडपाणी पाणी व्यवस्थापन शोचालय शोषखड्डे कचरा व्यवस्थापन शैक्षणिक साधने आदर्श कागदपत्रे इ उपक्रमांची पाहणी नागपूरचे विभागीय आयुक्त आनुद लिमये यांच्या मार्गदर्शनाखालील सात सदस्यांच्या समितीने केली. या पाहणीत पुणे कोल्हापूर सोलापूर सांगली व सातारा या पाच जिल्यांतील विभागीय पातळीवरील सर्वाधिक गुण साळुंब्रे येथील अंगणवाडीने मिळविले सरपंच धनंजय विधाटे उपसरपंच सुरेश राक्षे यांच्यासह गुलाबराव राक्षे बबन राक्षे यामराव राक्षे संतोष राक्षे, अंजनाताई टिळेकर, ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आदींचा गावाच्या या यशात वाटा आहे.

अंगणवाडीची कामगिरी

  1. पंचायत समितीचे प्रथम क्रमांकाचे पाच हजारांचे बक्षिस.
  2. जिल्हा परिषदेचे 25 हजार रुपयांचे पारितोषिक.