वनसंपदा

साळुंब्रे येथे वृक्षारोपण

साळुंब्रे येथे वृक्षारोपण करण्यात आले. येथील ग्रामप्रबोधिनी विद्यालयाचे प्रांगण, स्मशानभूमी परिसर व रस्त्यांच्या दुताफर्ा झाडे लावण्यात आली. जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम राक्षे, सरपंच धनंजय विधाटे, उपसरपंच सुरेश राक्षे, सांगवडेचे उपसरपंच अनिल राक्षे, पाचाणेचे माजी सरपंच छबूराव कडू, ग्रामपंचायत सदस्य गुलाब वाघोले, पोलिस पाटील बबन राक्षे, प्राचार्य व्यंकट भताने, विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.