विविध फोटो

विविध फोटो

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचेवतीने आदर्श ग्राम म्हणून साळुंब्रेगावाची निवड करुन थोर समाजसेवक मा. आण्णा हजारे यांच्या हस्ते ग्राम जागर पुरस्कार दिला आहे.


 संपूर्ण स्वच्छता अभियानातंर्गत साळुंब्रे गावाला निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झालेनंतर 26 जानेवारी 2005 ला पुणे जिल्हयाचे पालकमंत्री मा नामदार अजितदादा पवार साहेब यांनी पोलिस ग्राउंडवर आमचा सत्कार केला होता.


 संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये 2003 ला साळुंब्रे गावाला जिल्हयामध्ये तृतीय क्रमांकाचे 2 लाख रुपयाचे पारितोषिक मा नामदार विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या हस्ते स्विकारताना.


 संपूर्ण स्वच्छा अभियानातंर्गत पुणे जिल्हयामध्ये दुसरे हागणदारीमुक्त गांव होण्याचा मान साळुंब्रे गावाला मिळालेबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा देवराम लांडे साहेब यांच्या हस्ते बक्षिस स्विकारताना.


 मावळ तालुक्यच्या कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन साळुंब्रे येथे केले होते. तेव्हा मेाठया प्रमाणावर पंचक्रोशीतील नागरीकांना मोफत कायदेविषयक सल्ल्यांचा लाभ झाला तसेच अभियानामध्ये गावातील सर्व जिव्हाळयाच्या ाक्ती एकत्र केल्यामुळे सरपंच म्हणून गौरव.


के.ई.एम हॉस्पीटल व जिल्हा परिषद पुणे व साळुंब्रे गाव यांचे संयुक्त विद्यमाने साळुंब्रे ये​िो आदर्श प्रजनन व बाल आरोगय प्रकल्प राबविण्यात आला. त्याचा आमच्या गावाला व पंचक्रोशीतील लोकांना आरोग्य विषयक मोठा लाभ झाला.


 संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत सन 2004 ला परभणी येथील जिल्हा स्तरीय कमेटीस गावातील महिला बचत गटाने मत्स्य व्यवसायासाठी केलेला तलाव दाखविताना व व्यवसायाची माहिती देताना.


 पद्यश्री डॉ. डी.वाय पाटील हॉस्पीटल व महाविदयालय व साळुंब्रे गाव यांच्या संयुक्त सहकार्याने पंचक्रोशीतील महिलासाठी मोफत रक्तगट तपासणी व हिमोग्लोबीन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. तेव्हा रक्तदान शिबीर सुध्दा घेण्यात आले. तरी सरपंच म्हणून रक्तदान करताना.


संपूर्ण स्वच्छता अभियानात गावाला निर्मलग्राम पुरस्कार मिळालेबद्दल मा खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांनी साळुंब्रे गावाला भेट दिली तेव्हा त्यांना संपूर्ण गावाची माहिती देवून त्यांना संपूर्ण गाव फिरुन दाखविण्यात आले.


 खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एकंदरीत आमच्या यशस्वितेची माहिती दिली तेव्हा त्यांनी आमच्या कामकाजाची दखल देवून 5 लाख रुपयांचा निधी जाहीर केला.


 संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांर्गन सन2004 ला परभणी येथील जिल्हा स्तरीय कमेटीस संपूर्ण गावाला घेवून सामोरे जाताना तेव्हा गावाचा जिल्हयामध्ये दुसरा क्रमांक आला होता.


 संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत सन 2004 ला परभणी येथील जिल्हा स्तरीय कमेटीस माहिती देताना.

 


 संपूर्ण स्वच्छता अभियान व ग्राम स्वच्छता अभियानात उत्कृष्ठ काम केलेबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. सतिशमामा खोमणे यांनी साळुंब्रे गावाला भेट दिली.


 संपूर्ण स्वच्छता अभियान अभियानात जिल्हयामध्ये उत्कृष्ठ काम केलेबद्दल जिल्हा परिषदेचे सर्व साधारण सभेने आमचे कौतुक केले.


 पुणे आकाशवाणी केंद्रावर मुलाखत दिलेली आहे. त्याचे प्रसारण सुध्दा गेलयावर्षी झालेले आहे. अशाप्रकारे आमचे गाव आम्ही आकाशवाणी केंद्रावर सुध्दा गेलेले आहे.


 संपुर्ण स्वच्छता अभियानातंर्गत केंद्रीय तपासणी संस्थेचे मा कॅप्टन माथुर साहेब यांनी साळुंब्रे गावाची तपासणी केली होती.


 जागतिक बॅंक व यशदा यांचे प्रतिनिधी यांनी साळुंब्रे गावाला भेट देवून गावातील प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले.


 बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगार निर्माण करणेसाठी वेळोवेळी ग्रामसभा घेणते येतात तसेच अभियानामध्ये महिलांचा मोठा सहभाग यामुळे त्यांच्या कार्याची दखलसुध्दा अनेक ठिकाणी घेतली आहे.


 संपूर्ण स्वच्छता अभियानातंर्गत मावळ तालुक्याची कार्यशाळा साळुंब्रे येथे घेण्यात आली. तेव्हा मा. दिगंबरशेठ भेगडे यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले तेव्हा त्यांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला.


 संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये साळुंब्रे गावाने केलेल्या कामकाजाची त्यांनी दखल घेतली व हे अभियान संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये 100: राबविण्याबाबत सुचना दिल्या व साळुंब्रे गावाचे कौतुक करुन गावाला पाहिजे ती मदत देण्याची तयारी दर्शविली.


आदर्श जिल्हा प्राथमिक शाळा म्हणून साने गुरुजी पुरस्कार सुध्दा शाळेला मिळाला आमची प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व अंगणवाडीचे काम सुध्दा जिल्हयामध्ये प्रथम क्रमांकाचे आहे.


 साळुंब्रे येथे श्रमदानातून साळुंब्रे ते गहुुंजे साकव पुलाचे 10 लाख रुपयाचे काम आम्ही श्रमदान व लोकवर्गणीतून केले आहे.


 ग्रामपंचायत साळुंब्रे, ग्रामप्रबोधीनी विदयालय व पंचायत समिती मावळ यांचे सहकार्याने साळुंब्रे येथे मोठा जनावरांना लसीकरणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचा पंचक्रोशीतील शेतक-यांना मोठा लाभ झाला.


 सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धेमध्ये आमची अंगणवाडी विभागीय पातळीवर झळकली. विभागामध्ये प्रथम क्रमांक येवून 50000/- वे बक्षीस मिळाले तसेच अंगणवाडीस जिल्हयाचे व तालुक्याचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.