सार्वजनिक सन व उत्सव रचनात्मक पध्दतीने व शाततेने साजरे करणे.
जयंती, उत्सव इत्यादी समारंभ सार्वजनिक उत्सव साजरे करणा-या मंडळाचे कार्यक्रम व उत्सवांमधून समाजोपयोगी उपक्रम राबविणेवरील मुद्याला अनुसरुन गावामध्ये खालीलप्रमाणे कार्यक्रम राबविले गेले आहे.
सण
- वटपौर्णिमा कार्यक्रमाच्या माध्यमातून आदर्श पर्यावरण रक्षणाचा व संबधनाचा प्रयत्न करण्यात येतो. सर्व महिलांनी एकत्र येवून जुन्या वटवृक्षांची पारंपारिक पध्दतीने पूजा करुन प्रत्येकी एक वडाचे अथवा अन्य झाड लावून हा सण साजरा करण्यात येतो. याद्वारे सर्व उपस्थित महिलांना वटवृक्षाच्या पारंपारिक व आधुनि पध्दतीने सविस्तर मार्गदर्शन करुन झिम्मा, फुगडया व पारंपारिक गीते म्हणण्याचा कार्यक्रम उत्साहाने संपन्न होत असतो.
- शिवछत्रपतींच्या राज्यभिषेक सोहळयाच्या दिनविशेषानुसार विद्यार्थी व ग्रामस्थांच्या समोर ऐतिहासिक पथनाटय सादर करण्यात येते. तसेच पोवाडा गायन व शिवछत्रपतींवर गीत गायनाचा कार्यक्रम करण्यात येतो.
“शिवछत्रपतींच्याप्रतिमेचेपूजनकरतानाग्रामस्थवअभ्यागत”.
-
राखीसण– रक्षाबंधनानिमित्तस्नेहबंधनमेळाव्याचेआयोजनकरण्यातयेते. रक्षाबंधनयासणानिमित्तहानाविन्यपूर्णउपक्रमसाजराकरण्यातयेतो. यानिमित्तानेगावातीलवयोवृध्दग्रामस्थवमहिला, पुरुषतसेचपरिसरातील6 गावांतीलज्येष्ठमहिलावपुरुष, पेट्रोलपंपावरबाहेरुनयेणा–यामालट्रकचेचालकवअन्यपरप्रांतीयव्यावसायिकयांनारक्षाबंधनाच्यानिमित्तानेराख्याबांधण्यातवस्नेहबधनवाढविण्याचाअभिनवप्रकल्पगावातवपरिसरातीललोकांच्यासाठीराबवूनगावानेएकवेगळापरस्परांमधीलस्नेहवाढविण्याचाउत्सवसंपन्नकरुनगावात शातता, सुव्यवस्थावस्नेहभाववाढविण्यातयेतो.
स्मृतिदिन
- दि. 11 जून 2007 रोजी पांडुरंग सदाशिव साने तथा सानेगुरुजी यांच्या स्तृतिदिनाच्या निमित्ताने यामची आई या पुस्तकासंबंधिचे कथाकथनरुपी व्याख्यान आयोजित करण्यात येते.
- दि. जून 2007 रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात येतो.
- शालेय उपक्रम- दि. 4 जुलै 2007 रोजी स्वामी विवेकानंदांचा स्मृतिदिन साजरा करण्यात येतो. ााळांतर्गत विद्याथ्र्यांची निबंध स्पर्धा व कथाकथन स्पर्धा घेण्यात येते व परिसरातील 4 ााळांमध्ये जावून स्वामी विवेकानंदाबद्दल विद्याथ्र्यांनी माहिती सांगितली जाते.
- 1 आॅगस्ट 2007 रोजी लो. बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो व त्यावर लोकमान्यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात येते.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतिदिनाच्या निमित्ताने गावची एकसत्मता व एकसंघता टिकवून रहावी यासाठी ग्राम गीतेचे वाचन करण्यात येते.
स्वच्छतादिन
- दि. 20 जून 2007 रोजी जागतिक स्वच्छता दिनाच्या निमित्ताने ग्रामसफाईचा प्रकल्प राबविण्यात आला त्यामध्ये शाळांतील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित रहातात.
“ग्राम सफाई करताना साळुंब्रेकर ग्रामस्थ”
आरोग्य
- दि. 26 जून 2007 रोजी जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला व त्यात सर्व युवक युवती ग्रामस्थांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली जाते.
पुण्यतिथी
- संत सावतामाळी पुण्यतिथी साजरी करण्यात येते. गावातील ग्रामस्थांच्या वतीने कथाकथन, प्रवचन व संत सावतामाळी याच्या जीवनावर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करुन अन्नदानरुपी प्रसादाचे वाटप करण्यात येते.
- संत गाडगेबाबा पुण्यतिथीच्या निमित्ताने साळुंब्रे व परिसरातील 25 कि. मी. मधील 26 प्राथमिक शाळा व 11 माध्यमिक शाळा व 26 गावातील ग्रामस्थ, महिला यांच्या माध्यमातून पवनामाई उत्सव – पर्यावरण व पाणी प्रदूषण रोखण्यासाठीचा एक अभिनव उपक्रम साजरा करण्यात येतो. यात सहभागी झालेले हजारो विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी पवनानदी स्वच्छ व संुदर करण्याची प्रतिज्ञा घेतली. या उत्सवातून मावळ तालुक्यात इंद्रायणीमाईच्या उत्सवाची सुरुवात झाली.
“पवनामाईचाउत्सव”
वाहतुक शिस्त
- जुलै 2007 रोजी रस्ता सुरक्षा दिनानिमित्त विद्यार्थी व ग्रामस्थांना रस्त्यावरील वाहतुकीचे नियम, वेगावरील नियंत्रण, दुचारी व चारचाकी वाहनांची घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येते.
गौरव कृतज्ञता
- गुरुपौर्णिमेनिमित्त गावातील ज्येष्ठ व व्यावसायिक उद्योजक यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा अभिनव उपक्रम साजरा करण्यात येतो. गावातील शेतकरी, व्यावसायिक, गुणवान विद्यार्थी, आदर्श युवक व युवती, सेवाभावी वृत्तीचे ज्येष्ठ ग्रामस्थ यांचे कार्य गुरुतुलय मानून गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हदयस्पर्शी कार्यक्रम संपन्न करण्यात येतो यामुळे गावातील एकता व परस्परांबद्दलची आपुलकी व जीवाभावाचे नाते वाढण्यासाठी याचा खुपच फायदा झाला व होतो आहे.
“विविधगुरुतुल्यमान्यवरांचासत्कार”
पर्यावरण
दि. 5 जून 2007 या दिवशी जागतीक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये वृक्षदिंडी काढून सुमारे 100 रोपांची लागवड करण्यात आली. यासाठी सिनेक्रॉन सॉटवेअर कंपनीचे 75 सदस्य यानिमित्ताने उपस्थित होते.
“वृक्षदिंडीचेउद्घाटनकरतानामा. वामनरावअभ्यंकरकेंद्रप्रमुखज्ञा.प्र.निगडी”.
“वृक्षलागवडकरतानासिनेक्रॉनकंपनीचेप्रतिनिधीवग्रामस्थ”
राष्ट्रीय सन
- प्रजासत्ताक दिन-शाळेत प्रात्यक्षिके- प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो. ग्रामपंचायत, जि प शाळा तसेच ग्राम प्रबोधिनी विद्यालयात ध्वजारोहनाच्या कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात यावेळी उपस्थित ग्रामस्थांना क्रीडा प्रात्यक्षिके दाखविण्यात येतात.
- 15 आॅगस्ट- तंटामुक्त ग्रामयोजना जागृती. 15 आॅगस्ट रोजी भारतीय स्वातंयदिनाचा कार्यक्रम केला जातो गावातील अंगणवाडी जि.प. शाळा, ग्रामप्रबोधिनी विद्यालय व ग्रामपंचायत या ठिकाणी ध्वजारोहन करण्यात येते. त्या अगोदर संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली त्यात तंटामुक्त गाव योजनेविषयी जाणीव जागृती करणारी गीते व घोषणा म्हणण्यात आल्या व गाव निकासाचे व एकात्मतेचे अभंग तयार करुन सर्व ग्रामस्थांच्या समोर प्रभावीपणे गायनाचा कार्यक्रम होतो व त्यानंतर ग्रामसभेचे आयोजन केले जाते.
जयंती
- महात्मा गांधीच्या जयंतीच्या निमित्ताने सफाई करण्यात येते. तसेच बालसुरक्षा दिनही साजरा करण्यात येते. महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनचरित्रावर ग्रामस्थ व विद्याथ्र्यांना माहिती सांगण्यात येते तसेच ग्राम स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात येतो.
जागतिक महिला दिन
- महिला जागतिक मेळावा- महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत गावात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मेळावा श्री भैरवनाथ मंदिरात घेण्यात येतो सदर मेळाव्यास तळेगांव दा.पो.स्टे. पोलीस अधिकारी उपस्थित असतात.
नाविन्यपूर्ण उपक्रम गणेशोत्सव
-
एक गाव एक गणपती संकल्पनेनुसार गावात 7 दिवस विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते यामध्ये गाव माझा, मी गावाचा , गाव सुखी तर आम्ही सुखी, निरोगी ग्राम जीवनासाठी पोलिसांची भूमिका, तंटामुक्त गाव मोहिमेचे फायदे, गणेशोत्सवातून सामाजिक एकात्मता साधण्याचे लोकमान्यांचे स्वप्न, गावाचे आदर्श, विविध गुणदर्शन कार्यक्रम असे कार्यक्रम घेण्यात येतात. यानिमित्ताने मा डॉ. गिरीशराव बापट मा प्रा वामनराव अभ्यंकर, मा रामभाउ डिंबळे मा कांतिलालजी खिंवसरा मा डॉ शाळीगा्रम भंडारी, मा अॅड रविंद्र यादव, मा ह.भ.प.भगवानमहाराज कराड इ. वक्त्यांना यानिमित्ताने निमंत्रण देवून विचार यज्ञ गावात संपन्न झाले व याचा परिणाम परस्पर स्नेह वाढविण्यासाठी व ज्ञानवृध्दीसाठी झाला. या निमित्ताने गावातील महिलांसाठी गौरी सजावट स्पर्धा, पाककला स्पर्धा, उखाणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा विद्याथ्र्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंधलेखन व वेशभूषा स्पर्धा घेण्यात येते गावामध्ये दर दिवशी गावातील एका जोडप्याच्या हस्ते श्रीं ची पूजा करण्यात येते.