उल्लेखनीय बाबी

विशेष कार्य करणा-यांचा साळुंब्रेतील शाळेत सत्कार

  • साळुंब्रे येथील ग्राम प्रबोधिनी विद्यालयाच्या वतीने विविध क्षेत्रांत विशेष कार्य करणा-यांचा सत्कार करण्यात येतो. समीर राक्षे, संतोष बांदल, सौ. मनीषा आगळे, कानिफ गोपाळे, बाळासाहेब राक्षे, मयूरी भगत, श्रीमती. नायर, नवनाथ मु-हे, शेखर मु-हे , श्री. पानसरे व शोभा कळमकर आदींचा विशेष सत्कार उपनराध्यक्ष गिरीश खेर यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यालयाच्या वतीने सर्वांना संतश्री तुकाराम महाराजांची गाथा, श्री. हरिपाठ पुस्तक व भेटवस्तू देण्यात आल्या.

या कार्यक्रमास सरपंच धनंजय विधाटे, साहेबराव राक्षे, प्राचार्य व्यंकट भताने आदींसह शिक्षक उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून हा कार्यक्रम साजरा केला जातो.

महिलांसाठी विशेष मार्गदर्शक मेळावा

  • दि. 20 आॅगस्ट 2007 रोजी माहेरवाशीन मेळावा हा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमाद्वारे गावातील नवविवाहीत युवतींचा सत्कार करुन त्यांच्या भावी वैवाहिक जीवनाला संस्कारपूर्ण व मार्गदर्शनवर शुभेच्छा व आशिर्वाद देण्याचा समाजातील परस्परांमधील नाती दृढ करणारा व वैवाहिक जीवनाचे अर्थपूर्ण रहस्य उलगडविणारा कार्यक्रम म्हणजे माहेरवाशीन मेळावा या कार्यक्रमाची मूळ प्रेरणा समर्थ रामदासांच्या भाषेत ‘हाट भरला संसाराचा’ नफा पहावा देवाचा, तरीच या कष्टाचा परियाय होतो, यावर आधारित आहे. यामुळेही गावातील एकात्मता व एकसंघतेची भावना वाढीस लागण्यास मदत झाली.

 नवविवाहित मुलींवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी, त्याच्या हातून समाजाची सेवा घडावी, माणसे जोडण्याची प्रेरणा त्यांच्यात निर्माण व्हावी या उद्देशाने ग्रामप्रबोधनी विद्यालय यांच्या वतीने गेल्या नऊ वर्षापासून माहेरवाशीण मेळावा घेतला जातो. नागपंचमीच्या दुस-या दिवशी साळुंब्रे, गोडंुब्रे, दारुंब्रे, शिरगाव इत्यादी गावातील नवविवाहीत महिलांना बोलावून विद्यालयात त्यांची खणानारळाने ओटी भरली जाते.

उल्लेखनीय

साळुंब्रे ग्रामपंचायत स्थापना झाली आणि गाव विकासाच्या मार्गाने वाटचाल करु लागले स्थापनेपासून सतत 15 वर्षे ग्राम पंचायतीची निवडणूक बिनविरोध होत आहे. अतिशय कमी उत्पन्न मिळविणारी ग्राम पंचायत असूनही कोणतेही गट पक्ष न मानता गावचा विकास साधण्यासाठी समस्त ग्रामस्थ एकत्र आले. सुरुवातीला इतर कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता लोकवर्गणीमधून कामांना सुरुवात झाली हे एक वेगळे वैशिष्टय सांगता येईल. विकासाच्या गतीसाठी भव्य ग्रामपंचायत इमारत, लोकवर्गणीतून आदर्श प्राथमिक शाळा, अंगणवाडीची भव्य इमारत, सांस्कृतिक भवन, पेयजल पाण्याची टाकी, व्यायामशाळा, क्रीडांगण तसेच वाचनालयाच्या सुविधा निर्माण केल्या. आज महिला बचत गटामाफर्त गावात विविध धोरणात्मक निर्णय घेतले जातात तसेच विविध उद्योगही चालतात यामध्ये शिवणकाम, मिरची कांडप केंद्र, पापड निर्मिती उद्योग इ. तसेच आमदार फंडातून समाजमंदिर देखील बांधण्यात आलेले आहे.

शैक्षणिक

  1. गावात बालकामगार व बालगुन्हेगारांची समस्या नसल्यामुळे शिक्षण व स्वत:चा व्यक्तीमत्व विकास करण्याकडे बालकांनी पुरेसे लक्ष द्यावे असा प्रयत्न यानिमित्ताने केला जातो व लहान मुलांच्यावर विविध समारंभ, उत्सव व प्रशिक्षण शिबिरे यातून चांगले संस्कार केले जातात बालगुन्हेगारीचे प्रमाण आजिबात नसल्याचा आनंददायक अनुभव यानिमित्ताने आला.
  2. विधवा परित्यक्ता व निराधार महिलांच्या ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले व खालीलप्रमाणे विधवा, परित्यक्ता, अपंग व निराधार महिलांना मदत करण्यात आली. गरजू मुलांना व मुलींना माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी दत्तक पालक योजना कार्यरत करुन उद्योगपती व हितचिंमकांकडून आर्थिक लाभ मिळवून देण्यात आला व त्यामुळे अनेक मुला मुलींचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी आत्मविश्वास निर्माण झाला व गावातील एकात्मता यानिमित्ताने वाढली.

शैक्षणिक सुरक्षेबद्दल माहिती

  • रस्ता सुरक्षेबद्दल सर्व ग्रामस्​िा व विद्याथ्र्यांना मार्गदर्शन व विविध चित्र खुणांचे प्रदर्शन भरविण्यात आले. आर.एस.पी. रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत सर्वांनप माहिती देवून प्रबोधन करण्यात आले.