पवनामाईचा उत्सव

पवनामाई स्वच्छ, शुध्द व निर्मळ राहावी या उद्देशाने साळुंब्रे येथील ग्रामप्रबोधिनी विद्यालयाचे प्राचार्य व्यंकटराव भताने यांच्या संकल्पनेतून 1994 च्या डिसेंबरमध्ये पवनामाई उत्सवाची सुरुवात झाली.

थोर संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या उत्सवाचे आयोजन केले जाते. सध्याच्या बदलत्या पर्यावरणाच्या प्रदूषणाला व त्यामुळे हवा, पाणी अन्न व इतर मानव संबंधित बाबींच्याद्वारे होण-या प्रदूषणाला आळा बसावा म्हणून 12 वर्षार्पूर्वी ग्राम प्रबोधीनीच्या वतीने सुरु केलेला लोक सहभागातून अभिनव प्रकल्प म्हणून पवनामाई उत्सवाचा उल्लेख केला जातो.

पवनानदीच्या उगमस्थानापासून ते गहंुजे गावापर्यतंच्या 25 किमी अंतरापर्यंतच्या 23 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व 12 माध्यमिक विद्यालये यामधील सुमारे 15 हजार विद्यार्थि व सुमारे 5 हजार ग्रामस्थ यांच्या सहभागाने संत गाडगेबाबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पवनामईचा उत्सव संपन्न होतो. जलप्रदूषण होवू नये पवनेचे पाणी शुध्द व स्वच्छ राहावे पवना नदीत टाकावू पदार्थ टाकू नयेत यासाठी विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थंनी पवनाताईच्या काठावर येवून नदीची खणा नारळाने ओटी भरुन आरती म्हणावयाची व भावपूर्ण प्रतिज्ञा घेवून पवनामातेस अखंड शुध्द व स्वच्छ ठेवायचे असा पर्यावरण संवर्धनाचा अभिनव प्रकल्प सुरु केलेला आहे. वर्षभरात विद्याथ्र्यांच्या सहभागाने जि प प्राथमिक शाळा व माध्यतिक विद्यालये नदीचा काठ सौंदर्यपूर्ण करण्यासाठी वृक्षारोपण करणे, महिन्यातून एकदा नदीकाठाची स्वच्छता करणे, वृक्षसंवर्धन करणे व नदीकाठी शोचासाठी न जाण्याची प्रतिज्ञा घेतली जाते असे प्राचार्य व्यकंटराव भताने यांनी स्पष्ट केले.

गेल्या 12 वर्षाच्या या उत्सवाच्या माध्यमातून केलेल्या अनेक विद्यार्थी व ग्रामस्थांच्या तपचर्येनंतर ख-या अर्थाने निर्मलग्राम होण्यासाठी गावागावांना प्रेरणा मिळते आहे. पवन मावळातील साळंुब्रे हे मावळ तालुक्यातील पहिले गाव या उत्सवातून निर्मलग्राम होवू ाकले व त्याबरोबरच शिरगाव, गहंुजे, सांगवडे ही गावेही त्या पाठोपाठ निर्मलग्राम बनली व दारुंब्रे व गोडुंब्रे ही आणखी 2 गावे निर्मलगा्रम होण्याच्या उंबरठयावर आहेत, पवना धरणापासून पवनानगर ते गहंुजे या पट्टयातील अनेक जि प प्राथ शाळा व माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, अध्यापक, विद्यार्थी व ग्रामस्थांचा पवनामाई उत्सवातील सहभाग दरवर्षी वाढतो आहे. त्यातून नदी स्वच्छ व शुध्द राखण्याची जाणीवजागृती मोठया प्रमाणात होत आहे. गावागावातील ग्रामस्थांच्या सवयी बदलून घर तेथे शोचालय ही कल्पना पुढे येत ओ. ाासन व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने अनेक गावामध्ये पवनामाई बद्दलची कृतज्ञता या उत्सवाच्या माध्यमातून वाढत राहणार आहे.

या उत्सवाचा परिणाम म्हणून गोमुख संस्थेच्या माध्यमातून हॉलंड या देशातील पर्यावरण तज्ज्ञांनी या उत्सवात सतत 3 वर्षे प्रत्यक्ष भेट दिली व हॉलेडमधील बोथएंड या संस्थेने -हाईन व इस्युजिली नदयांवर असा लोकसहभागातून उत्सवाद्वारे नद्यांवर असा लोकसहभागातून उत्सवाद्वारे प्रयोग सुरु केलेला आहे. इमेल वरुन परस्परांना मार्गदर्शनाचा व पर्यावरण शुध्दीकरणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिनव प्रयोग ग्रामप्रबोधिनी विद्यालयाचे माध्यमातून सुरु झाला आहे. गेल्या 2 वर्षापासूनपवनामाई उत्सवाबरोबर इंद्रायणीमाता उत्सव कामशेत येथील पंडित नेहरु विद्यालय व करंजगावच्या गोल्डन ग्लेझ विद्यालयाच्या सहभागातून सुरु झालेला आहे तर यावर्षापासून आंदर मावळातील माळेगाव येथील वरसुबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड यांच्या पुढाकराने आंद्रामाई उत्सव ही साजरा होणार आहे. नदीमाता आपल्या जवीनरसाने सर्वांना जगवते. कदाचित आईचे दूध नसले तरी चालेल पण त्या नदी मातांचे शुध्द हवेच नद्यांच्या नावावरुन आपण आपल्या मुलींची नावे ठेवतो नदीमाताचा विसर पडू नये हा एक प्रयत्न असतो.

नीतीशास्त्रात उल्लेखल्याप्रमाणे सर्व चराचर सृष्टीशी मानवाचे जिव्हाळयाचे संबंध असावेत व मानवाने मानवतेवर सृष्टीचे शक्य तितक्या प्रेमाने संगोपन करावे व त्यामुळेच तो सृष्टीत श्रेष्ठ असे सिध्द होईल. आपण घेण्यापेक्षा सर्व सृष्टींवर आपण प्रेम करतो म्हणून असे म्हणवून घेण्यत मानवाचा खरा मोठेपणा आहे.

गेेली 12 वर्षे ग्रामप्रबोधिनी विद्यालयाच्या पुढाकाराने मावळातील विविध शाळा व ग्रामस्थांनी एक आगळा वेगळा प्र्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला आहे. म्हणूनच नाम घेता वाटचाली यश पावलो पावली असे संत तुकारामांच्या भाषेत म्हणावेसे वाटते.

पवनानगर येथे तळेगाव लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी तर शिवणे येथे मावळ तालुका माध्य शाळा मुख्या संघाचे सचिव रोंद्र देशमुख बौर येथे मुख्याध्यापक आर जी भांड व रोकडेसर तसेच बेबडेमोहोळ येथे हांडेसर उर्से माध्य विद्यालयाचे मुख्याध्यापक पी व्ही शिंद्र चाफळकर मॅडम व प्राचार्य व्यंकटराव भताने यांनी मार्गदर्शन केले. पवनामाई उत्सवाची सुरुवात साळुंब्रे येथील ग्रामप्रबोधिनी विद्यालयाद्वारे झाली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पवनानगर, शिवणे, बैर, बेवडेमोहोळ या ठिकाणी पवनामाईच्या काठी घाटावर हा उत्सव पार पडतो.

- उपक्रम बी.एम. भसे.