सामाजिक सुरक्षिततेसाठी

हुंडा नको, नको मानसन्मान ! राखू परस्परांच्या नात्याचा मान !!

सामाजिक सुरक्षिततेसाठी कार्यक्रम राबविणे

  • गावातील माध्यमिक शाळेच्या मदतीने महिला मेळाव्याच्या निमित्ताने हुंडा घेणार व देणार नाही अशा अर्थाची जाग्रती निर्माण करण्याचा प्रयत्न केला यासाठी मार्गदर्शनासाठी अनुभवी महिला संघटनेच्या प्रतिनिधींना बोलावून प्रबोधनात्मक कार्यक्रम करण्यात येतात.
  • महिलांचे सामाजिक प्रश्न व कौटंुबिक समस्या सोडविण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी, पुणे या संस्थेेतील मानसशास्त्र विभागाच्या वतीने मार्गदर्शनाची व्यवस्था केलेली आहे.
  • गावात ज्येष्ठ नागरिकांसाठी व त्यांचे प्रश्न समजून घेवून सोडविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करुन त्याद्वारे कौटंुबिक, वैयक्तिक, सामाजिक प्रश्न सोडवून त्यांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
  • बचतीचे गट बांधू, अर्थप्राप्तीने गुण्यागोविंदाने नांदू, महिला बचत गट व सक्षमीकरण, पुरुष बचत गट संख्या-2, महिला बचत गट संख्या-20, दारिद्रय रेषेखालील बचत गट संख्या-3. ,गावातील प्रत्येक कुटंुबाचा बचत गटशी संपर्क व बांधिलकी आहे बचत गटाचा पुढील टप्पा म्हणजे पतसंस्था गावामध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या सुप्रिया सहकारी पतसंस्थेमध्ये अनेकांनी शेअर्स गुंतवलेले आहे. गावात सामुदायिक सोहळयाचे आयोजन करुन त्याद्वारे सामाजिक संघटन वाढवून खर्चात बचत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावत बालविवाह होणार नाहीत व मुलींचे शिक्षण उत्तम प्रकारे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आले.

ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यरत करणे

गाव समितीने घेतली दीक्षा ! गावाची राखण्या सुरक्षा !!

  • तंटामुक्त गाव समितीच्या वतीने गावामध्ये सात जणांचे ग्राम सुरक्षा दल स्थपित करुन त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण व गणवेश देण्यात आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून अन्य युवकांचा सहभाग वाढविण्यात येवून गटनिहाय रात्रीच्या गस्तीचे नियोजन केलेले आहे व यामुळे गावची सुरक्षा वाढविण्यास मदत झालेली आहे.
  • लाठी, शिट्टी, काठी यांचे ग्राम सुरक्षा दलातील जवानांना प्रशिक्षण देण्यात आलेलें आहे
  • ग्राम सुरक्षा दलाची रात्रगस्त तीन, तीन जवानांचे गट करुन रात्रगस्त घालण्याचे कामकाज सुरु आहे.

फोटो- ग्रामसुरक्षा दल.,


अवैध धंदयाना प्रतिबंध करणे व त्याचे निमूर्लन करणे

ग्राम दैवताची शपथ घेवू ! व्यसनांपासून दूर राहू !!

 “तंटामुक्तगावयोजनेसाठीआयोजितकरण्यातआलेलीग्रामसभा”

  • गावात अवैध धंदे चालविणारे कोणीही व्यक्ती नाही तसेच बाहेरुन येणा-यांवर प्रतिबंध रहावा यासाठी तंटामुक्त गाव समिती सतत जागरुकपणे कार्य करते आहे. गावात कायमस्वरुपी दारुबंदी आहे.
  • व्यसनमुक्तीसाठी व्यसनी लोकांचे समुपदेशन करुन प्रभातफे-या काढून पथनाटयाद्वारे लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न प्रभावतीपणे सुरु आहे यासाठी कधीही पोलिस यंत्रणेची मदत घ्यावी लागली नाही परंतु पोलिस अधिका-यांचे मार्गदर्शन सातत्यपूर्ण मिळते.
  • गाव संपूर्ण व्यसनमुक्त असून गावाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्याचे सर्व फोटो संकलित करण्यात आलेले आहेत.
  • दि 30.1.2008 रोजी मा. श्री. शरदराव ठोंगे पाटील साहेब व मा. श्री. राजेंद्र पाटील साहेब यांचे अध्यक्षतेखाली व्यसनमुक्त गाव या विषयावर बैठक घेण्यात आली.

“तंटामुक्तगावकरावयाचीकार्यवाहीमार्गदर्शनाबाबतशिबिर”क्षणचित्र. मार्गदर्शकमा.शरदरावठोंगेपाटील, उपविभागीयपोलीसअधिकारीपुणेपो. ग्रामीण.


सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे संरक्षण करणे व विद्रुपीकरण रोखणे

  • गावात निवडणकू वाढदिवस अथवा इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने कुठल्याही भडक स्वरुपाच्या जाहिराती करणारे फलक लावले जात नाहीत. सर्वांनी एकत्रित येवून स्वत:च्या विकासासाठी व गावच्या विकासासाठी वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी चांगला संकल्प करण्याची पध्दती यानिमित्ताने सुरु करण्यात आली.
  • शासकीय व सार्वजनिक मिळकती उदा. गायरान जागा, समाजमंदिरे यावरील अतिक्रमण रोखण्यासाठी आवश्यक त्या सोयी व सुविधा करण्यात आलेल्या आहेत. गायरान जागेवर तारेचे कुंपन घालून वृक्षारोपन करण्यात आले व त्याचा कुठलाही गैरवापर होवू नये यासाठी ग्राम पंचायतीच्या अधिकाराखाली दोन सदस्यीय समिती कार्यरत आहे ती खालीलप्रमाणे
    1. श्री. जालिंदर ज्ञानोबा कडेकर
    2. श्री. बबन चिंधे राक्षे

विद्रुप झालेल्या सार्वजनिक मालमत्तांची दुरुस्ती करण्यात आली ती खालीलप्रमाणे

  • गावाचे चावडीचे जुने कार्यालय दुरुस्त केले.
  • श्री.हनुमान मंदिर व श्री. भैरवनाथ मंदिर दुरुस्त केले. त्याठिकाणी भव्य सभागृह उभारले.
  • गावातील सार्वजनिक बागेचे संरक्षण व्हावे व स्वच्छता रहावी यासाठी पक्क्या भिंतीचे कुंपनकरण्यात आले आहे.