शेती मार्गदर्शन
……….नाविन्यपूर्ण उपक्रम……. स्वावलंबी शेतीसाठी एकात्मिक प्रशिक्षण प्रकल्प
भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने पुरस्कृत केलेला स्वावलंबी शेतीसाठी एकात्मिक प्रशिक्षण प्रकल्प योजना योजनेअंतर्गत साळुंब्रेसह परिसरातील पाच गावांमध्ये संेद्रिय शेती व पशुपालनाची प्रशिक्षण शिबिरे तसेच सेंद्रिय किटकनाशक निर्मिती व हरितगृह तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली व या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षित झालेल्या शेतकरी पुरुष व महिला यांचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे.
- गांडुळखत निर्मिती व शेतीमध्ये त्याचा वापर.
- पशू आहार व्यवस्थापन.
- पशू आरोग्य व्यवस्थापन.
- पीक संरक्षण.
- हरितगृह तंत्राज्ञान.
प्रकल्पची उद्दिष्टे
- पूर्णपणे रासायनिक असलेल्या शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा व औषधांचा वापर वाढवून शेतमालाच्या उत्पादनावरील खर्च कमी करणे. शेतक-यांना त्यांच्या शेतीवरील जैविक संपत्तीचा वापर करुन शेतावरच खत व औषधे तयार करण्यासाठी प्रशिक्षण देणे.
- पशुपालन व दुग्धव्यवसाय यामधील ोतकरी महिलांचा सहभाग वाढवून त्यांना शास्त्रीय माहिती देणे.
- आर्थिक क्षमता असलेल्या शेतक-यांना व तरुणांना हरितगृह तंत्रज्ञानाची ओळख व मार्गदर्शन करुन उत्पन्न वाढीची संधी देणे.
“डी. बी. आर. टी प्रकल्पाद्वारे उभारलेले पॉलिहाउस पाहताना खा. शिवाजीदादा आढळराव पा.”
सल्ला मार्गदर्शन केंद्र
- शेती पर्यवेक्षकांनी वेळोवेळी शेतक-यांना प्रत्यक्ष शेतांवर जावून देतात.
- पीकसंरक्षण, गांडुळखत निर्मिती व वापर, पशुपालन, हरितगृह तंत्रज्ञान, प्रक्रिया, लागवड व शेतीपूरक उद्योगासंबंधी सल्ला.
शेतीतील व पशुपालनातील सुधारणा
प्रकल्पातील प्रशिक्षण कार्यक्रम व सततच्या मार्गदर्शनामुळे शेतक-यांनी शेतीमध्ये व पशुपालनामध्ये पुढील सुधारणा अंगीकारल्या आहेत. उदा. माती परीक्षण, पशुलसीकरण, बीज प्रक्रिया क्षार मि़श्रणाचा वापर गोठा व जनावरांची स्वच्छता गांडुळखताचा वापर सेंद्रिय औषधांची/अर्काची निर्मिती व फवारणी, पशुसाठी आयुवेर्ेदिक औषधे पशू आहारात मिठाचा वापर, हरितगृहातील फुलशेती खतांचे व्यवस्थापन हिरवळीच्या खताचा वापर चा-यावर युरीया प्रक्रिया अंबवणाचा वापर.
- शेतीपरूक अर्थाजनाच्या संधी
- सांगवडे येथे 27 व शिरगाव येथे 1 अशा एकूण 28 हरितगृह प्रकल्पांची सुरुवात.
- जुलै 06 ते फेब्रुवारी 07 या कालावधीत 14 हरितगृह प्रकल्पांची 14,82,000/- चे उत्पन्न मिळाले व एकूण 21,82,000/- ची उलाढाल भांडवली खर्च वगळून या कालावधीत झाली.
- प्रकल्पाच्या कालावधीमध्ये एकूण 44 गांडुळखत प्रकल्प सुरु करण्यात आले त्यापैकी 30 ोतक-यांकडे गांडुळखताचे प्रकल्प सुरु आहेत 6 जण गांडुळखताची विक्री करतात.
गोडंुब्रे गावातील सौ. छाया सावंत या महिलेने 150 किलो क्षार मिश्रणाची विक्री केली.
“कृषिसप्ताहानिमित्त कृषि दिंडी व फलकांद्वारे जनजागती करणारे विद्यार्थी”.
पाणीशेती
स्वावलंबी शेतीसाठी हरितगृहाची उभारणी प्रशिक्षणासाठी करण्यात आली. गावात सर्वांना शुध्द व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पाणी पुरवठयाची योजना अद्ययावत करण्यात आली. गावात मत्स्य उत्पादन व शेत तळयांचे प्रयत्न करण्यात आले. गावात माध्यमिक शाळेत राष्ट्रीय मुक्त विद्यालयाच्या केंद्राला मान्यता घेवून मुलभूत ग्रामीण तंत्रज्ञान पदविका या कंेद्राची स्थापना करण्यात आली. गावात अद्ययावत व्यायामशाळेची उभारणी सुरु आहे. गावात आयुर्वेदिक उपचार व सल्ला केंद्र सुरु करण्यात आली. तंटामुक्त गाव समृध्द गावासाठी गावाचा अभंग, पोवाडे तयार करुन गाण्यात आली. स्वच्छता अभियान व निर्मलग्राम योजना आग्रहपूर्वक व यशस्वितेने राबवून गावातील लोकांचा आत्मविश्वास वाढविण्यात आला.