ग्रामपंचायतीची सर्व राजकीय पक्षांनी सामंजस्याने बिनविरोध निवडणूक करुन गावाने नवा आदर्श घडविला. गावातील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक शाततेत पार पाडण्यासाठी साळुंब्रेसह परिसरातील अन्य गावातील विविध पक्षांचे राजकीय नेते, निवडणुकीचे उमेदवार व मतदार बंधू – भगिनींनी सहकार्य करुन एक वेगळा आदर्श निर्माण केला. पतपेढयांच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत, ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध करुन गावातील शातता, सुव्यवस्था, भाउबंदकी, परस्परांविषयी तेढं, राजकीय वैमनस्य व गावात यामुळे वाढणरा कायमचा तणाव दूर होण्यासाठी याचा खूपच उपयोग झाला व अन्य गावांच्यासाठी एक वेगळा आदर्श निर्माण होवून शेजारी असणा-या शिरगाव या ग्राम पंचायतीचे निवडणूक बिनविरोध झाली.