गावातीलहोग्रामस्था ! वाढवूपरस्परांमधीलआस्था !!
व्यक्तीगत समारंभ व कार्यक्रम उत्सव- नाविण्यपूर्ण
- गावातील लग्न समारंभात वरात हा एक हौसेचा व खर्चाचा भाग तसेच त्यामध्ये जारोत वाजणारी वाद्ये, गुलाल व ध्वनीप्रदूषण यांच्या दुष्परणिामांची दखल घेवून वरातबंदी हा उपक्रम हाती घेतलेला आहे व त्याची अंमलबजावणी ग्रामस्थ काटेकोरपणे करतात.
- वैयक्तिक समारंभासाठी अनिष्ट नष्ट करण्यासाठी समिती दक्ष असते.
- गावात दर सप्ताहातून एकदा नवीन बातमीपत्र सादर करण्याची पद्धती सुरु करण्यात आली व याद्वारे ग्रामस्थांना जागतीक व परिसरातील घाडामोडी एकत्रित बसून ऐकण्याची सवय वाढलेली आहे व यामुळे गावाची एकी वाढण्यास मदत झाली आहे.
“शिस्तब्ध्दमिरवणुकीसाठीचेग्रामप्रबोधिनीविद्यालयातीलविद्याथ्र्यांचेबर्चीनृत्य”.
- गणेशोत्सवात गावातील माध्यमिक शाळेने एक आदर्श मिरवणुकीसाठी बर्ची पथकाची स्थापना करुन शाततापूर्ण व शिस्तबध्द मिरवणूकीचे प्रात्यक्षिक तळेगाव दाभाडे, देहूरोड, कामशेत, चिंचोली या गावातील गणेशोत्सव मिरवणुकीत सादर केले यात मद्यपान न करणे, गुलाल न उधळणे, वेडेवाकडे अथवा धांगडधिंगायुकत नृत्य न करणे अशी प्रतिज्ञा विविध मंडळांकडून घेतलेली आहे.
- गावात ग्रामस्िा आपल्या मुलांचे वाढदिवस एकत्रित येवून व नवीन संकल्प करुन साजरे करतात यानिमित्ताने ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देणे, वृक्षारोपन करणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.