मिळालेले पुरस्कार

ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार

साळुंब्रे सलग पाचव्यांदा प्रथम– तालुक्यात सर्वाधिक पारितोषिक – कार्ला दुसरे, सांगवडे तिसरे वराळे उर्से उत्कृष्ट

  • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात साळुंब्रे गावाने तालुक्यात सलग पाचव्या वर्षी प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे या अभियानात कार्ला ग्रामपंचायतीने दुसरा तर सांगवडे गावाने पहिला क्रमांक पअकवला आहे. स्वच्छ अंगणवाडी स्वच्छ प्राथमिक शाळा व दलित वस्ती विकास व सुधारणा अशी सर्व पारितोषिके साळुंब्रे गावानेच पटकावली आहेत.

“संतगाडगेबाबाग्रामस्वच्छताअभियानामध्ये2003 लासाळुंब्रेगावालाजिल्हयामध्येतृतीयक्रमांकाचे2 लाखरुपयाचेपारितोषिक”.मा.नामदारविजयसिंहमोहितेपाटीलसाहेबयांच्याहस्तेस्विकारताना.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या पहिल्या फेरीत प्रथम या गावाने याच क्रमाने उत्कृष्ट सरपंच व उत्कृष्ट ग्रामसेवकांचा  बहुमान प्राप्त केला आहे. साळुंब्रे गावचे सरपंच जालिंदर कडेकर, उपसरपंच नितीन राक्षे व ग्रामस्वच्छता कमिटीचे अध्यक्ष व माजी सरपंच धनंजय विधाटे सर्व सदस्य महिला व ग्रामस्थांनी या अभियानात सहभागी होवून विविध उपक्रम राबविले आहेत.


स्वच्छतेकडून समृध्दीकडे साळुंब्रे गावची वाटचाल विकासाकडे

  1. ध्येयाने पेटून उठलेली व्यक्ति आपला हेतू साध्य करण्यासाठी झपाटल्यासाखरे काम करीत असते. पण एखादे गाव जर ध्येयाने पेटून उठले तर काय करु शकते याचे उदा. द्यावयाचे झाले तर पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यात साळुंब्रे गावचे देता येईल. गांवात शभर टक्के शोचालय हा उपक्रम राबविल्याबद्दल ाासनाचे दोन लाख रुपयाचे पारितोषिक मिळविलेले व पुणे जिल्हा परिषदेचे एक लाख रुपयाचे पारितोषिकही पटकावले आहे.

“संपूर्णस्वच्छ अभियानातंर्गतपुणेजिल्हयामध्येदुसरेहागणदारीमुक्तगांवहोण्याचामान

साळुंब्रे गावालामिळालेबद्दलजिल्हापरिषदेचेअध्यक्षमादेवरामलांडेसाहेबयांच्याहस्तेबक्षिसस्विकारताना.

मनुष्यांना आदर्श कर्तव्याचा मार्ग दाखविणारी आचारपध्दती म्हणजे संसकृती.


जातीय व धार्मिक सलोखा निर्माण करणे

  • गावात असणा-या मागावर्गीय, अल्पसंख्यांक लोकांमध्ये अतिशय स्नेहाचे व धार्मिक सलोख्याचे नाते असून परस्परांच्या सण उत्सव व जयंत्या एकत्रितपणे साजरे करण्याची आदर्शव्रत प्रथा गावात अनेक वर्षापासून सुरु आहे व याचेच प्रतिक म्हणून पुणे जि. प. च्या वतीने गावाला मिळालेला छत्रपती शाहू महाराज एकात्मता पुरस्कार होय.
  • तसेच गावात विविध धर्म व पंथियांच्या प्रार्थना स्थळांना ग्राम पंचायतीने सार्वजनिक निधीच्या खर्चातून डागडुजी करण्याचे कामकाज केलेले आहे. गणेशोत्सव, ईद तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे अनेक सण एकत्रितरित्या साजरे केले जातात.

“महात्मा गांधी पुण्यतिथी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती एकत्रित साजरी करताना क्रा.पं.सदस्य”.


अभिमान वाटाव्यात अशा काही बाबी

  • गावाला सतत 5 वर्षे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान– तालुकास्तरीय व जिल्हास्तरिय – प्रथम क्रमांक
  • राजश्री शाहू महाराज पुरस्कार.
  • अंगणवाडी केंद्र साळुंब्रे, विभागात प्रथम.
  • महात्मा फुले शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास योजना, ग्राम प्रबोधिनी विद्यालय, साळुंब्रे, पुणे जिल्हयात द्वितीय.
  • तालुकास्तरिय स्वच्छ संंदर शाळा स्पर्धा, जि.प. प्राथ शाळा प्रथम क्रमांक संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विभागस्तरावर गावाचा तृतीय क्रमांक आल्याबद्दल मा. विजयसिंह मोहिते पा उपमंख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते.
  • निर्मलग्राम पुरस्कार पुरस्कार ग्रामपंचायतीस मा. राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मावळ तालुक्यातील पहिले निर्मलग्राम.

“निर्मलग्रामपुरस्कारवितरणसमारंभ”क्षणचित्र, हस्तेमा. ए.पी.जेअब्दुलकलामराष्ट्रपती, भारतसरकारसोबतपालकमंत्रीमा. ना. अजितदादापवार.

  • 15 ते 35 वयोगटात 100 टक्के साक्षरतेचे प्रमाण.
  • गावातील दुर्बल घटकातील सदस्यांचा खर्च लोकवर्गणीतून केला जातो.

जि.प. प्राथ शाळा साळुंब्रे

  1. पंचायत समिती मावळद्वारे आदर्श शिक्षिका पुरस्कार, मा. चंदाताई रामाणे.
  2. पंचायत समिती मावळद्वारे आदर्श शिक्षिका पुरस्कार मा. जगताप मॅडम.

अंगणवाडी केंद्र साळुंब्रे

  1.  जि. प. पुणे. द्वारे आदर्श अंगणवाडी सेविका.
  2. पंचायत समिती मावळद्वारे कुटूंब कल्याण कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पारितोषिक व सन्मानचिन्ह.
  3. जि. प. पुणे. द्वारे कुपोषण निमूर्लन कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष गौरव.