माहिती

मावळ तालुक्यातील पहिले शोचालय युक्त गाव

ग्रामपंचायतीची स्थापना 1956 ची असून दि 5/1/2003 ला नविन ग्रामपंचायत सरपंचाची निवडणूक होवून नवनिर्वाचित सरपंच धनंजय रघूनाथ विधाटे यांनी ग्रामपंचायतीने कामाकाजास सुरुवात केली ग्रामपंचायतध्ये सात सदस्य असून 5 पुरुष व 1 महिला सदस्य आहेत.

गावामध्ये पूर्वी गा्रमीण स्वच्छता कार्यक्रमांतर्गत 28 शोचालयाची कामे झाली गावातील कुटंुब संख्या 225 असून बहुतेेक कुटंुबांना शोचालयाची सोय नव्हती 1 सार्वजनिक शोचालय यूनिट होते परंतु ते सुध्दा बंद होते गावाच्या चारही बाजूने बागायती फुलांची शेती असलेमुळे व शेतात कायम शेतक-यांचा वावर असलेमुळे महिलांना प्रर्विधी साठी कोठेही मोकळी आडोशाची जागा नव्हती गावाच्या आसपासचे सर्व रस्ते शोचाने माखलेले होते सरपंचानही ग्रामपंचायत माफर्त शोचालय बांधणेचा मनोदय केला त्यामुळे सदस्यांनी स्वत: पहिले शोचालय बांधकाम करणेचे ठरविले आज सर्व सदस्यांच्या घरी शोचालये आहेत.

पुढे पुणे जिल्हा परिषदेच्या संपूर्ण स्वच्छता अभियानाचा चित्र रथ गावामध्ये फिरविणेत आला सोनपावल चित्रफित दाखविणेत त्याचा मोठा फायदा 100: गाव हागणदारी मुक्त होणेसाठी झाला. गटविकास अधिकारी आर बी दिघे साहेबांनी गाव 100: हागणदारी मुक्त करणेसाठी दत्तक घेत असलेचे जाहीर केले. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांचेकडून मदत मिळवून देणेच मा गा वि अ यांनी आश्वासन दिले. नियोजनाप्रमाणे प्रवर्तकाची जबाबदारी ग्रामसेवक श्री जे बी शिदोरे यांनी घेवून कामास सुरुवात करणेत आली. प्रथम ग्रा पं. चे 15: खर्चातून 40 मागासवर्गीयांना प्रत्येक 10000 रु. चे शोचालय साहित्य वाटप करुन त्यांची ाौचालये पूर्ण करुन घेणेत आली. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने शोचालयाची भांडी पुरविण्याचे काम केले. जनरल लाभाथ्र्यांसाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने रु. 500000/- चे आर्थिक सहाय्य केलेले आहे. गावामध्ये 21 दा रे खालील कुटंुबे असून सर्व कुटंुबाकडे स्वत:ची वैयक्तिक शोचालये बांधलेली आहेत. गावात एकूण 225 कुटंुबे असून एकूण 182 शोचालये आहेत त्यापैकी 90 शोचालये नविन बांधलेली आहेत, 225 कुटंुबे 182.