साळुंब्रे

!! एक जीव उमदे व्हावे, जनजीवन गावोगावी,

या माजयाभारतदेशी, सुखस्वप्ने फुलूनी यावी !!

प्रस्तावना -

“साळुंब्रे हे गाव ! पुण्यभूमी ठाव ! दैवताचे नाव बापूजीबुवा!!”

या प्रमाणे साळुंब्रे हे गाव पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यातील पवना नदीच्या तीरावर वसलेले आहे. या गावाकडे पाहिले की प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ल्यांचा अभ्यास करणारे व अशा शेकडो किल्ल्यांवर जावून आलेले पूज्य गो नी दांडेकरांच्या ‘पवनाकाठच्या धोंडी’ या पुस्तकाची व त्या पुस्तकात साकारलेल्या काटक, प्रेमळ, इतरांना मदत करणारा, इतरांच्या किंवा स्वत:च्या विकासासाठी तन्मयतेने झटणारा पवनाकाठचा धोंडी आठवतो.

‘ग्रामदैवत- श्री. काळभैरवनाथ’

सन 1911 साली रामनवमीच्या निमित्ताने चाललेल्या नाटकामध्ये झालेला अपघात व त्यात मृत्यूमुखी पडलेले अनेक जीव यांची आजही प्रत्येक गावातील जुन्या-नव्या पिढीतील गावक-यांना स्मरण झाल्याशिवाय रहात नाही. त्याचवेळी स्वत:च्या भावाला शोधत आलेले प्रसिध्द साहित्यिक व विनोदी लेखक डॉ. प्र. के. अत्रे, पूज्य श्रीधरस्वामींच्या शिष्याचाही निवास गावात होता त्यामुळे पवना नदीच्या काठावर असलेले गाव मुख्य हमरस्त्यापासून 6 कि.मी. वर द्रुतगती मार्गापासून 4 कि.मी. असलेले गाव गेल्या 1 मे 2007 पासून महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या तंटामुक्त गाव अभियानात पूर्णत: सहभागी आहे. यातून गावातील लोकांची एकी, विविध सामाजिक गटांचे एकात्किकरण लहान मोठया गटांसाठी राबविलेले सामाजिक व मानसिक उत्थानासाठीचे उपक्रम गावाने राबविले आहेत. सहयाद्रीच्या कडेकपारीमध्ये बसलेल्या व लेहगडापासून जवळच असलेल्या पवना नदीच्या बारमाही पाण्याने सिंचित होणारे गाव व गावातील शेती यामुळे गावातील सर्वच लोकांची वाढणारी मानसिक प्रसन्नता महाराष्ट्र शासनाच्या तंटामुक्त गाव अभियानामुळे गावातील एकात्मका व एकी वाढून गावाचे ख-या अर्थाने गोकूळ झाल्याचे दिसते.

ग्राम-गौरव अभंग

गांव माझा माझा माझा माझा मी गावाचा !!

गांव पाहावयासी गेलो ! गांवकरी होऊनि ठेलो !

गांव राहावे निर्मळ ! अशी धरीन मी तळमळ !!1!!

गांवासंगे फुलली शाळा ! व्यसनांना ती घालील आळा !

गांवातील शेती भाती ! राहावी तिच्याशी दृढ नाती !! 2 !!

गांवातील हो ग्रामस्था ! असावी एकमेंका आस्था !

एकी असेल आमुचे मुळ ! वादविवाद घालवू समूळ !! 3 !!

गावाचा चालवण्या गाडा ! नको राजकीय राडा !

गाव आणि गांवकरी ! नको तेथे सावकारी !! 4 !!

नाते असू द्या हो जीवाचे ! ओस पडू नये घरटे साचे !

शिकूया आणि गावात टिकूया ! शहरांतजाऊननकोचवाकूया!! 5 !!

खेडयामध्ये भारत खरा ! सार्थ आपण करु हा नारा !

प्रबोधिनीचा गाऊनी अभंग, गांवी होऊया हो दंग !! 6 !!

रचना:- व्यं. मा. भताने, प्राचार्य/कार्यवाह

ग्रामप्रबोधिनी विद्यालय, साळुंब्रे

ता.मावळ, जि.पुणे.